Advertisement

उद्धव ठाकरेंचे भाऊ जयदेव यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा का दिला? काय आहे वादाची पार्श्वभूमी

फक्त उद्धव ठाकरेच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही जयदेव ठाकरे यांचे संबंध चांगले नव्हते. नेमकं हेच कारण की जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्याचा दावा अनेकांनी केला.

उद्धव ठाकरेंचे भाऊ जयदेव यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा का दिला? काय आहे वादाची पार्श्वभूमी
SHARES

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray) शिंदे गटामध्ये (Eknath shinde) सामील झाल्याचे बुधवारच्या मेळाव्यात दिसून आले. बीकेसीवर (BKC) सुरु असलेल्या दसरा मेळ्याला (Dasara Melava) जयदेव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली.

निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांच्यानंतर जयदेव ठाकरे यांनीही शिंदे गटाची वाट धरल्यामुळे हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जातोय. जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद तर आता जगजाहीर आहे. फक्त उद्धव ठाकरेच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही जयदेव ठाकरे यांचे संबंध चांगले नव्हते. नेमकं हेच कारण की जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्याचा दावा अनेकांनी केला.  

नेमकं बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा जयदेव ठाकरे यांच्याशी असलेला नेमका वाद आहे तरी काय? जाणून घेऊयात.

बाळासाहेब जयदेवला कंटाळले होते?

सार्वजनिक जीवनात आपल्या भेदक भाषणांनी ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे हे खासगी आयुष्यात मुलांशी अतिशय प्रेमळ वागायचे. मुलांना शिस्तीत आणण्यासाठी ते मारहाणीच्या विरोधात होते. त्यांनी स्वतः आपल्या मुलांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

बाळासाहेबांना तीन मुले आहेत. थोरले बिंदू माधव (1996 मध्ये अपघातात निधन झाले), जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे.

बाळासाहेबांचे थोरल्या आणि धाकट्या मुलाशी चांगले संबंध होते. पण जयदेव ठाकरे यांच्याशी कायम कटुता राहिली. 2012 साली बाळासाहेबांचे निधन झाले पण त्यापूर्वी सुमारे दोन दशके जयदेव यांच्याशी त्यांचे संबंध कधीच प्रेमळ नव्हते. बाळासाहेब ठाकरे जयदेवला इतके कंटाळले होते की त्यांनी एकदा सामनामध्ये लिहिले होते – तो मुलगा त्रासदी आहे.

वडील आणि मुलामध्ये कटुता का होती?

बाळासाहेब आणि जयदेव यांच्यातील संबंध 1990 च्या सुरुवातीपासूनच ताणले गेले. जयदेव यांचे पहिले लग्न जयश्री कालेलकर यांच्याशी झाले होते. त्या लग्नात जयदेव आनंदी नव्हते, असे म्हटले जाते. त्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाला होता. त्याचवेळी जयदेवने मोठे पाऊल उचलले आणि ते जयश्रीपासून वेगळे झाले. या विभक्ततेमुळे बाळासाहेब आणि जयदेव यांच्यातील दुरावा आणखीन वाढला.

जयदेव यांनी दुसरे लग्न स्मिता ठाकरे यांच्याशी केले. पण जयदेव यांनी काही वर्षांतच स्मितापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णयही बाळासाहेबांना आवडला नाही. 1995 मध्ये बाळ ठाकरे यांच्या पत्नी मीना यांचे निधन झाले आणि पिता-पुत्राच्या नात्यातील ताण आणखी वाढला. जयदेव यांनी घरी येणं जाणंही सोडलं. जयदेव यांनी तिसरे लग्नही केले आहे. तिसऱ्या पत्नीचे नाव अनुराधा आहे.

संपत्तीवरून उद्धव विरुद्ध जयदेव

2012 साली बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यांनी मृत्युपत्रात जयदेव ठाकरे यांना काहीही दिले नाही. मात्र, त्यांनी सून स्मिता आणि नातू ऐश्वर्य यांच्या नावे संपत्तीचा काही भाग सोडला. हे जयदेव यांना खटकले.

शिवसेनाप्रमुख (Shiv sena) बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद उफाळून आला होता.

मृत्यूसमयी बाळ ठाकरे यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा आरोप जयदेव यांनी केला होता. या विरोधात ते न्यायालयता देखील गेले. त्यात जयदेव यांनी दावा केला की, तो माझा मुलगा नाही. कोर्टात त्यांनी उद्धव ठाकरेंवरही आरोप केले होते.

त्यानंतर हा वाद मुंबई हायकोर्टातही गेला. पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रातील मजकुराबद्दल संशय व्यक्त केला होता. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात जयदेव ठाकरे यांनी दावा मागे घेतला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीची मालकी उद्धव ठाकरेंना मिळाली आहे. खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नसल्याचं सांगत जयदेव ठाकरे यांनी याचिका मागे घेतली.



हेही वाचा

मी गद्दारी नाही तर गदर केला, उद्धव ठाकरेंच्या आरोपावर शिंदेंचं प्रत्युत्तर

Shiv Sena Dasara Melava 2022 : शिवसैनिकांचा जनसागर लोटला, घोषणांनी दादर परिसर दुमदुमला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा