मूलभूत हक्कांसाठी उपोषण

 Goregaon
मूलभूत हक्कांसाठी उपोषण

गोरेगाव पूर्व - आरेतील आपो कॉलनीतील मुलभूत सुविधा बंद केल्यामुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे नवक्षितीज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल कुबरे आणि त्यांचे सहकारी हे 25 ऑक्टोबरला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. झोपड्या दुरूस्ती, शौचालय, लाईट मीटर बसवणे अशा अनेक मूलभूत मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणाला आरेतील रहिवासी संघाने लेखी स्वरूपात ट्रस्टचे अध्यक्ष यांच्याकडे पाठिंबा दर्शवलाय.

Loading Comments