Advertisement

हार्दीक पटेलचे मुंबईकरांना आवाहन


हार्दीक पटेलचे मुंबईकरांना आवाहन
SHARES

गोरेगाव - हार्दीक पटेल यांनी मंगळवारी गोरेगावच्या पटेल समाज आणि व्यापारी समाजाला भेट दिली. "मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फॅन आहे. बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. त्यांना वंदन करण्यासाठी मी इथे आलो आहे." असे मत हार्दीक पटेल यांनी व्यक्त केलं. तसेच "आपले हित जोपासणाऱ्या पक्षालाच आपण निवडून दिले पाहिजे," असे आवाहनही हार्दीकने या वेळी केलं.

त्याचप्रमाणे, "समाज पर्वतन करण्यासाठी जनतेने पुढे आले पाहिजे. गुजरातमध्ये आवाज उठवायचे म्हटलं तर अत्याचार केला जातो. महिलांवर 307 चा कलम लावला जातो. मुंबईत असे नाही. त्यामुळे जनतेने विचार करून सत्ता चांगल्या लोकांच्या हातात द्यायला हवी," असे मत हार्दीकने मांडले. तर, "हार्दीक पटेल सारखे युवा नेते आणि शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मिळून काम केले, तर गुजरात किंवा महाराष्ट्र नाही तर हिंदुस्थान बदलेल," असे मत शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा