SHARE

पवई - आयआयटी मूड इंडिगो या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी हजेरी लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले. या सगळ्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तरं दिली आहेत. पंतप्रधान व्हायच्या स्वप्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना टोमणा मारला आहे. मला मुख्यमंत्री राहू दे. ज्यांनी पंतप्रधान व्हायचं स्वप्न बघितलं ते पंतप्रधान बनले नाहीत. शरद पवार, लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंग यांच्याकडे पाहा. मला मुख्यमंत्रीच राहू द्या, असा मार्मिक टोला फडणवीसांनी लगावला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या