'दोन काय दहा दिवस जेलमध्ये राहीन'

 Pali Hill
'दोन काय दहा दिवस जेलमध्ये राहीन'

मुंबई - "खड्डे बुजवले नाहीत म्हणून मुख्य अभियंत्याच्या हातात पाटी देत त्याला खड्ड्यात उभे केले. त्यासाठी दोन दिवस जेलमध्ये जाऊन आलो. आता जेलची सवय झाली असून अऩुभवही आला आहे. पण तरीही मुंबईतले खड्डे काही बुजत नसून पालिका प्रशासनाला जागही येत नाही. त्यामुळे आता पालिका आयुक्तांनाच खड्ड्यात उभं करावं लागलं आणि त्यासाठी दोन काय दहा दिवस जेलमध्ये रहावं लागलं तरी चालेल," अशा शब्दांत मनसे नगरसेवक संदिप देशपांडे यांनी थेट पालिका आयुक्तांवरच खड्ड्यांच्या मुद्दयावरून निशाणा साधला.

या संदर्भात गुरुवारी स्थायी समितीची बैठक झाली. बैठकीत खड्ड्याच्या विषयावर चर्चा झालीच नाही. त्यामुळे संदीप देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट आयुक्तांना आव्हान दिलं आहे.

Loading Comments