Advertisement

पाकिस्तानला हादरवण्यासाठी मिराज-२००० विमानाचीच निवड का? जाणून घ्या...

एकाच वेळी भारतीय हवाई दलाची १२ मिराज २००० विमानं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात शिरली आणि त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यासाठी याच विमानाची निवड का करण्यात आली? हे आपण जाणून घेऊयात.

पाकिस्तानला हादरवण्यासाठी मिराज-२००० विमानाचीच निवड का? जाणून घ्या...
SHARES

पुलवामा इथं झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्याला भारताकडून अखेर चोख उत्तर देण्यात आलं आहे. अवघ्या १२ दिवसांमध्ये भारतानं पाकिस्तानवर हवाई हल्ला करत दुसरा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. बालाकोट, चकोटी आणि मुझ्झफराबाद इथल्या जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या तळावर भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास हल्ला केला. एकाच वेळी भारतीय हवाई दलाची १२ मिराज २००० विमानं पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात शिरली आणि त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यासाठी याच विमानाची निवड का करण्यात आली? हे आपण जाणून घेऊया.

  • १९७० मध्ये फ्रान्सच्या दसा एव्हिएशन कंपनीनं मिराज २००० विकसीत केलं.
  • मिराज २००० जगातील अत्याधुनिक आणि आघाडीच्या लढाऊ विमानांमध्ये गणले जाते.
  • मिराज २००० हे अमेरिकेच्या एफ १५ आणि एफ १६ या विमानांच्या तोडीस तोड आहे.
  • १९८३ पासून मिराज २००० फ्रेंच हवाई दलात सामील
  • डेल्टा विंग्ज म्हणजेच त्रिकोणी आकाराचे पंख हे मिराज २००० चे वैशिष्ट्य
  • डेल्टा विंग्जमुळे त्याला वेगानं हवाई कसरती किंवा डावपेच करण्यास मदत
  • ताशी कमाल २ हजार ३३८ किमी इतका वेग
  • मिराज २००० एका मिनिटात ५६ हजार फूट उंची गाठते
  • ६ हजार ३०० किलो वजनाची शस्त्रात्रे वाहून नेण्याची क्षमता
  • मिराजवर शक्तीशाली डाॅप्लर रडार, एकावेळी २४ लक्ष्यांचा माग घेण्याची क्षमता
  • हवेतून हवेत मारा करणारी आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता
  • कारगिल युद्धात मिराज २००० विमानांचा वापर करण्यात आला



हेही वाचा - 

भारताचा पाकवर एअर स्ट्राईक, देशभरातून हल्ल्याचं स्वागत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा