Advertisement

पाकव्याक्त काश्मिरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले, २०० ते ३०० दहशतवादी मारले

भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन तळ उद्ध्वस्त केले आहेत. देशभरातून या हल्ल्यातं स्वागत करण्यात येत आहे. एकप्रकारे हा दुसरा सर्जिकल स्ट्राईक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं.

पाकव्याक्त काश्मिरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले,  २०० ते ३०० दहशतवादी मारले
SHARES

पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून करत जैश--मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे ३ तळ उद्ध्वस्त केले आहेत.  मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता  केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकमध्ये तब्बल २०० ते ३०० दहशतवादी ठार झाले आहेत. दरम्यान, भारताचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे.


सर्वात मोठी कारवाई

१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. पाकिस्तानला धडा शिकवण्याची भावना देशभरातून व्यक्त होत होती. त्यानंतर अवघ्या १२ दिवसात भारताने पाकव्याप्त काश्मिरमधील जैश--मोहम्मदचे ३ तळ हवाई हल्ले करत उद्धवस्त केले.  भारतीय वायूसेनेच्या १२ मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैशच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकले.  

या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचीही माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्करानं भारतीय विमाने पीओके घुसल्याचे मान्य केलं आहे. मात्र, त्यांनी कुठलीच जिवीतहानी झाल्याचं वृत्त फेटाळलं आहेपाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेनं केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचं बोललं जातंय.


हल्ल्याचं स्वागत

भारताच्या या कारवाईनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. लष्कारने केलेल्या या  सर्जिकल स्ट्राईकचं देशभरातून स्वागत होत आहे. 

"भारतावर करण्यात आलेल्या हल्ल्याची परतफेड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत एक मजबूत देश म्हणून पुढे येत आहे. या हल्ल्यानंतर देशातल्या नागरिकांनी घाबरायचं कारण नाही."

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


भारतानं आज पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. आता तर ही सुरुवात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहिदांच्या स्मरणार्थ सोमवारी स्मारकाचं उद्घाटन केलं आणि आज त्यांचा बदला घेतलाआता भारत पाकिस्तानला पुरवण्यात येणारं पाणी देखील बंद करेल, अशा भावना राज पुरोहित यांनी व्यक्त केल्या.



काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील हल्ल्याचं स्वागत केलं आहे. हवाई दलाच्या पायलटला माझा सलाम, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.  






Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा