Advertisement

दादरच्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ‘इमर्सिव्ह म्युझियम’

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या महापौर निवासस्थान इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येत आहे.

दादरच्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ‘इमर्सिव्ह म्युझियम’
SHARES

दादरच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या महापौर निवासस्थान इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येत आहेयास्मारकात आता ‘इमर्सिव्ह म्युझियम’ साकारले जाणार आहेया संग्रहालयाच्या कामासाठी १५० कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहेत्यामुळे आता या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने संग्रहालयाच्या कामासाठी निविदा मागविण्यात आली आहे.

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा प्रयत्न मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीएकेला जात आहेयाचाच भाग म्हणून आता स्मारकात ‘इमर्सिव्ह म्युझियम’ साकारले जाणार आहेमहापौर निवासस्थान येथील .९४ एकर जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. 

दोन टप्प्यांत स्मारकाचे काम करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात इमारतीचे बांधकामस्थापत्यविद्युतवातानुकूलित यंत्रणा उभारणीबाह्य सजावटवाहनतळ उभारणी यासह अन्य कामे केली जाणार आहेततर दुसऱ्या टप्प्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे संग्रहालय बांधले जाणार आहे. 

त्यानुसार आता ‘इमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स’ स्वरूपात हे संग्रहालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आरश्रीनिवास यांनी दिलीपुढील  महिन्यांत संग्रहालयाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून काम सुरू झाल्यापासून  महिन्यांत नावीन्यपूर्ण संग्रहालय पूर्ण करण्यात येणार आहेजानेवारी २०२३ मध्ये हे संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.

या संग्रहालयात १२ विशेष दालने असणार असून बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासातील विविध टप्पे मांडले जाणार आहेतहे संग्रहालय अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे असणार आहेत्यामुळे येथे येणाऱ्यांना आपण बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संवाद साधला असल्याचात्यांच्या प्रतिमेला स्पर्श करत असल्याचा अनुभव मिळणार आहेअत्याधुनिक अशा डिजिटल भिंतीलेझर शोदृकश्राव्य माध्यमव्हर्च्युअल रियालिटी अशा तंत्रज्ञानाचा वापर करून हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. 

डिजिटल भिंतीवरील एखाद्या माहितीवर बोट लावल्याबरोबर (क्लिककेल्याबरोबर त्याबाबतची माहिती दृकश्राव्य रूपात दिली जाईललखनऊमध्येइमर्सिव्ह म्युझियम एक्सपिरियन्स’ संग्रहालय आहेमात्र या संग्रहालयापेक्षाही वेगळे आणि अधिक प्रगत असे तंत्रज्ञान वापरून हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा