Advertisement

२०२४ मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार - आदित्य ठाकरे

मुंबईचे महत्व कमी करुन सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण, २०२४ मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं असे वक्तव्य राज्याचे पर्यावरणंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

२०२४ मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार - आदित्य ठाकरे
SHARES

मुंबईचे महत्व कमी करुन सगळं दिल्लीला नेण्याचा डाव आहे. पण, २०२४ मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं असे वक्तव्य राज्याचे पर्यावरणंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. इतर पक्ष नाटकं करतात आपण परखडपणे बोलतो. मराठीचे काय होणार याची आजच्या दिवशी चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करुया. मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकली नाही आणि आजही ही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही असेही आदित्य ठाकरे म्हटलं.

सुभाष देसाईंनी आम्हाला शासकीय मराठी भाषा सक्तीची केली आहे. ती समजायला जरा अवघड आहे. जीआर वाचायला घेतला तर समजत नाही. देसाई सरांना विनंती आहे की ती थोडी सोपी करुन द्यावी असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मरिन ड्राईव्हला आपण मराठी भाषा मंडळाची इमारत उभारत आहोत. मराठी बदलत आहे. मराठी भाषेचा अभ्यास करण्याकरता वाचनालय उभारत आहोत. गिरगांव चौपाटीच्या बाजुला मराठी आणि संस्कृतीचे कलादालन सुरु करत असल्याचेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसंच जास्तीत जास्त चित्रीकरण मुंबईत होतील याकरता प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

मराठी भाषेच्या शाळा, मातृभषेतील शाळा कमी होतात की जास्त यावरुन वाद सुरु असतात. पालकांचा कल सेमी इंग्रजीकडे असतो. मुंबई महापालिकेच्या १ हजार २३२ शाळा आहेत. मात्र, कोणतंही बोर्ड असो १०वी पर्यंत मराठी शिकवलंच जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा