सपनों के सौदागर अबु आसीम आझमी

    मुंबई  -  

    दादर - स्वप्नपूर्तीची तमा न बाळगता मोठी स्वप्नं पहायला शिकावीत ती अबु आसीम आझमी यांच्याकडून. राजकीय विश्लेषक काहीही म्हणोत, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीला नव्वद जागांवर यश मिळेल. मुळात समाजवादी पार्टी लढणारच आहे 90 जागांवर. म्हणजे यशाची हमी 100 टक्के! ही आकडेवारी एखाद्या सर्वेक्षणातून पुढे आलेली नाही. तर सपाचे मुंबईतले एकमेव आमदार आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबु आसीम आझमी यांचा हा दावा आहे. ‘मुंबई लाइव्ह’ च्या ‘उंगली उठाओ’ अभियानांतर्गत यु ट्युब आणि फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ‘मुंबई लाइव्ह’ च्या कार्यालयात आलेल्या आझमी यांनी टीम मुंबई लाइव्हनं विचारलेल्या प्रश्नांना आपल्या परिचीत शैलीत उत्तरं दिली. महिलांवर अत्याचारांच्या वाढत्या घटनांसाठी पुरुषांची विकृत मनोवृत्ती जबाबदार असल्याचं त्यांनी मान्य केलं खरं, पण तोकड्या कपड्यांमध्ये वावरणा-या महिलाच यासाठी जबाबदार असल्याचं पालुपद त्यांनी पुन्हा आळवलं. मुंबईत समाजवादी पार्टीला शून्य जागांचा पक्ष करण्याच्या एमआयएमच्या वल्गना हवेत विरतील. उलट समाजवादी पार्टीच शिवसेना-भाजपाला शून्य जागांवर आणेल, असा दुर्दम्य आशावाद अबु आझमी यांनी व्यक्त केला.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.