Maharashtra Budget 2020: राज्यभरात पेट्रोलच्या किंमतीत वाढ होणार


Maharashtra Budget 2020: राज्यभरात पेट्रोलच्या किंमतीत वाढ होणार
SHARES

ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. अर्थमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर १ रुपयांचा कर लावण्याची घोषणा केली.

पेट्रोल-डिजेलवर प्रति लिटर १ रुपयांचा कर लावण्यात येणार असल्यानं भविष्यात पेट्रोलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत सद्यस्थितीत पेट्रोलची किंमत ७६.८३ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ६६.८२ रुपये आहे. यामध्ये वाढ झाल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

या करवाढीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, इंधनावरील मूल्यवर्धित कर वाढवल्याने शासनाला सुमारे १८०० कोटी इतका अतिरिक्त महसूल मिळणं अपेक्षित आहे. हा निधी वातावरण बदलासंदर्भातील वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी वापरला जाणार आहे. बाजूच्या राज्यात बघितलं तर कालच कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर आपल्यापेक्षा जास्त वाढवले आहेत. तिथं भाजपचंच सरकार आहे. मात्र त्यांनी केलं म्हणजे आपणही केलं पाहिजे असा माझा दृष्टीकोन नाही. पण ग्लोबल वॉर्मिंगचं संकट, अवकाळी पाऊस, गारपीट अशा सतत काही ना काही नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडत असताना त्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी या रकमेची आवश्यकता आहे. आधीच्या पिढीने योग्य पावले उचलली असती तर आमच्यावर हे संकट आलं नसतं असा दोष पुढच्या पिढीनं आम्हाला देता कामा नये यासाठीच सरकारने काळजी घेतली आहे. 

अर्थसंकल्पातील काही महत्वाचे मुद्दे :

 • मुंबई पुण्यात मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट देण्याची घोषणा
 • नाट्य संमेलनासाठी दहा कोटींचे अनुदान
 • तृतीयपंथीयांच्या स्वतंत्र मंडळासाठी ५ कोटी
 • मुंबईत वस्तू आणि सेवा केंद्र उभारणार, वस्तू आणि सेवा केंद्रासाठी १४८ कोटी रुपये
 • मुंबईत मराठी भाषा भवन
 • नवी मुंबईत महाराष्ट्र भवन बांधणार
 • वरळीत पर्यटन संकुल उभारणार
 • दररोज एक लाख शिवभोजन थाळ्या
 • शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींची तरतूद
 • कबड्डी, कुस्ती, खो खो, व्हॉलिबॉल स्पर्धांचं आयोजन
 • महिला बालविकास विभागासाठी २ हजार ११० कोटी
 • किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन उपब्लध करून देण्यात येईल
 • दहावी उत्तीर्ण व्यक्तींना रोजगार प्रशिक्षण
 • २१ ते २८ वर्ष वयोगटातील बेरोजगारांना सक्षम करणार,
 • पाच वर्षात १० लाख बेरोजगारांना प्रशिक्षण
 • महामंडाळाच्या बसेसं बदलून वायफाययुक्त बस देणार
 • जुन्या एसटी बस बदलून नवीन सुविधा युक्त बस देणार
 • एसटी महामंडळासाठी निधीची तरतूद
 • प्राथमिक आरोग्यासाठी ५ हजार कोटीची तरतूद
 • मेडिकल डीग्रीच्या ११८ जागा वाढवणार
 • नव्या रुग्णवाहिकांसाठी २५ कोटी, जुन्या रुग्णवाहिका दोन वर्षांत बदलणार
 • मुंबई-गोवा महामार्गासाठी केंद्राकडून १२०० कोटींचा निधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चर्चा, गडकरींचे आभारहेही वाचा -

काही मिनिटात ४ लाख कोटींचा चुराडा, शेअर बाजार कोसळला

CID ची वेबसाईट दहशतवादी संघटनेकडून हॅकसंबंधित विषय