Advertisement

एम पूर्व विभागात दोन प्रभाग वाढले


एम पूर्व विभागात दोन प्रभाग वाढले
SHARES

चेंबूर - आगामी पालिका निवडणुकीसाठीच्या प्रभाग पुर्नरचनेत एम पूर्व विभागात दोन प्रभागांची भर पडली आहे. त्यामुळे येथून इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
चेंबूर एम पूर्व विभागात प्रभाग 129 ते 141 असे 13 प्रभाग होते. मात्र सोमवारी रंगशारदा येथे झालेल्या प्रभाग पुर्नरचना सोडतीत प्रभाग क्र. 147 आणि प्रभाग क्र. 148 असे दोन प्रभाग वाढले आहेत. याबाबत प्रभाग क्र.141 चे नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांच्याशी संपर्क साधला असता "पक्षाने उमेद्वारी दिल्यास आपल्या पत्नी रुक्मिणी खरटमोल यांना प्रभाग 148 मधून उमेद्वार म्हणून उभे करणार आहेत", असे सांगितले. तर प्रभाग 140 च्या नगरसेविका उषा कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता "पक्षाने उमेद्वारी दिल्यास उभे राहू अन्यथा पक्षाचे काम करत राहू", अशी प्रतिक्रिया दिली.
प्रभाग क्र. 134 चे नगरसेवक राहूल शेवाळे हे रेल्वेच्या बैठकीसाठी बंगळुरू येथे गेल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तसेच प्रभाग 130 चे मोहम्मद सिराज शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा प्रभाग महिंलासाठी खुला झाल्यामुळे त्या प्रभागातून पक्षातर्फे महिला उमेद्वार देवून स्वत: प्रभाग 139 मधुन लढत लढविण्याची इच्छा दर्शविली. मात्र अन्य प्रभागातील नगरसेवकांशी संपर्क होवू शकला नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा