Advertisement

बीएमसीमध्ये आता शिवसेनेचे संख्याबळ ९६ वर

मुंबई महापालिकेमध्ये (mumbai municipal corporation) शिवसेनेचे (shiv sena) संख्याबळ आता ९६ वर पोहोचलं आहे.

बीएमसीमध्ये आता शिवसेनेचे संख्याबळ ९६ वर
SHARES

मुंबई महापालिकेमध्ये (mumbai municipal corporation) शिवसेनेचे (shiv sena) संख्याबळ आता ९६ वर पोहोचलं आहे. कांदिवली (Kandivali) प्रभाग क्र. २८ मधील काँग्रेस (congress) चे नगरसेवक राजपती यादव यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलं आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असणारे शिवसेनेचे उमेदवार एकनाथ (शंकर) हुंडारे यांचा नगरसेवक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच पालिका सभागृहात होणार आहे. 

लघुवाद न्यायालयाने (court) सोमवारी कांदिवली  (Kandivali) प्रभाग क्र. २८ मधील नगरसेवक राजपती यादव यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यामुळे शिवसेनेचे (shiv sena) एकनाथ (शंकर) हुंडारे आता नगरसेवक होतील. त्यामुळे पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ९६ होणार आहे. २०१७ मधील पालिका निवडणुकीत काँग्रेसचे राजपती यादव हे निवडून आले होते. मात्र त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार शिवसेनेचे शंकर हुंडारे यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती. एप्रिल २०१९ मध्ये यादव यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय समितीने दिला होता.

मात्र या निर्णयाविरोधात यादव यांनी आधी उच्च न्यायालयात (high court) आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दोन्ही न्यायालयांनी यादव यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे लघुवाद न्यायालयाने शिवसेनेेचे हुंडारे यांना नगरसेवक म्हणून घोषित केले. एकनाथ हुंडारे यांच्या नावाची लवकरच सभागृहात घोषणा होईल. 



हेही वाचा -

सेंद्रीय खत प्रकल्प उभारणाऱ्या ६ इमारतींना कर सवलत

BMC Budget 2020: महापालिका उघडणार सीबीएसई, आयसीएससी शाळा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा