सर्जिकल स्ट्राईकनंतर मुंबईत हाय अलर्ट

 Mazgaon Dock
सर्जिकल स्ट्राईकनंतर मुंबईत हाय अलर्ट

मुंबई - पाकव्याप्त काश्मीरमधील भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर मुंबईमध्ये हाय अलर्ट करण्यात आला आहे. नौदलाला भारताच्या पश्चिम समुद्रकिना-यावर अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबईतील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये वेस्टर्न नेव्हल कमांड अनेक कार्यक्रमांचे आयोजन करते. मात्र सर्जिकल स्ट्राईकनंतर नौदलाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. एक आणि दोन ऑक्टोबर रोजी सैन्याच्या युद्धनौकेवर सामान्यांसाठी आयोजित केलेले प्रदर्शनही रद्द करण्यात आले आहे. तसेच 3 ऑक्टोबर रोजी एनसीसी कॅडेट, सैनिक स्कूलचे विद्यार्थी, इतर शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी समुद्रात आयोजित केलेले सैन्याचं प्रदर्शन रद्द झाले आहे.

Loading Comments