Advertisement

आंतरराष्ट्रीय योग दिन : राज्यपालांनी राजभवनात केली योगासनं


आंतरराष्ट्रीय योग दिन : राज्यपालांनी राजभवनात केली योगासनं
SHARES

गुरुवारी २१ जून रोजी मुंबईसह जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंबईतील मरीन ड्राईव्ह, शिवाजी पार्क, बीकेसी, गेट वे ऑफ इंडिया इत्यादी ठिकाणांसह विद्यापीठाच्या संल्गनित विविध शाळा आणि कॉलेजांमध्ये योग दिन साजरा होत असताना राज्यापल सी. विद्यासागर राव यांनी राजभवनात आयोजित योग सत्रात योगासनं केली.



या योग सत्रामध्ये राज्यपालांनी प्राणायामबरोबरच वेगवेगळी आसनं केली. यावेळी राज्यपालांसह त्यांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजीत कुमार तसंच राजभवनातील कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते.

राज्यपालांनी राजभवन येथील समुद्रकिनारी योगप्रेमी नागरिकांनसोबत योगासनं केली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


हेही वाचा -

मुंबईत 'योगोत्सव'

आंतरराष्ट्रीय योग दिन : मुख्यमंत्र्यांसह उपराष्ट्रपतींनी केला योगा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा