Advertisement

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीची शक्यता?

यावेळी उद्धव यांच्यासोबत खासदार संजय राऊत, आमदार अनिल परबही सोबत आहेत. तर मनसे नेतेही शिवतीर्थवर उपस्थित आहेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीची शक्यता?
SHARES

शिवसेना (shiv sena ubt) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या भेटीसाठी 'शिवतीर्थ' निवासस्थानी गेले होते. गेल्या दोन महिन्यात ठाकरे बंधूंची ही चौथी भेट ठरली आहे. 

याआधी दोन्ही ठाकरे बंधू कौटुंबिक कारणास्तव भेटत होते. मात्र राजकीय कारणास्तव ही ठाकरे बंधूंची पहिलीच भेट असल्याचे म्हटले जात आहे.

ठाकरे गटाचा दसरा मेळावा आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी उद्धव यांच्यासोबत खासदार संजय राऊत, आमदार अनिल परबही सोबत होते. तर मनसे नेतेही शिवतीर्थवर उपस्थित होते.

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यावेळेस आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणाले होते. यामुळे उद्धव ठाकरे या भेटीबाबत आधीपासूनच सकारात्मक दिसत होते.

ही भेट पूर्वनियोजित असल्याची माहिती आहे, परंतु भेटीचे नेमके प्रयोजन अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

गणपती दर्शनाच्या निमित्ताने गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी गेले होते. यानंतर जेमतेम दहा-बारा दिवसातच ठाकरे भावंडांची पुन्हा भेट झाली. जवळपास अडीच तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती.

मिळालेल्या माहितीनुसार उद्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेतील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे युतीच्या चर्चांना आणखीन पाठबळ मिळाले आहे.



हेही वाचा

गणेशोत्सवातील फुलांचा कचऱ्याचे खतात रुपांतरण

मुंबईत लवकरच मेट्रो लाईन 2B सुरू होणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा