नेतान्याहू काय म्हणाले मोशेला? छाबड सेंटरला दिली भेट


  • नेतान्याहू काय म्हणाले मोशेला? छाबड सेंटरला दिली भेट
  • नेतान्याहू काय म्हणाले मोशेला? छाबड सेंटरला दिली भेट
SHARE

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरूवारी दुपारी नरिमन हाऊसला भेट देत. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत यहुदी धर्मप्रचारकांसोबत दहशतवादी हल्ल्यात आपले आई-वडील गमावलेला बेबी मोशे देखील होता.

मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

गुजरात दौरा पूर्ण केल्यानंतर मुंबईच्या दौऱ्यावर आलेले नेतान्याहू बुधवारी रात्री मुंबईला पोहोचले. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचं मराठमोळ्या पद्धतीत स्वागत करण्यात आलं.कडेकोट बंदोबस्त

त्यानंतर हॉटेल ताजमध्ये यहुदी समाजाच्या प्रतिष्ठित लोकांना भेटून ते २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नरिमन हाऊस अर्थात छाबड सेंटरला आले. तिथे त्यांनी बेबी मोशे होल्त्जबर्गची भेट घेतली. यावेळी नेतान्याहू यांनी छाबड सेंटरमध्ये उभारलेल्या संग्रहालयाचं उद्घाटनही केलं.

त्यांच्या आगमनापूर्वी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नरिमन हाऊस परिसरातील सर्व दुकानांची झाडाझडती घेण्यात आली. कडक पोलीस बंदोबस्तात वाहतूकही काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.द्वेष आणि प्रेमाचा संगम

नेतान्याहू यांच्यासोबत बेबी मोशेने ज्या ठिकाणी त्याच्या आई-वडीलांनी प्राण गमावले तो रुम पाहिला. यावेळी नेतान्याहून मोशेला म्हणाले की, इस्त्रायली लोकांचं प्रेम आणि इस्त्रायली लोकांबद्दलचा द्वे यांचा संगम म्हणजे हे स्थळ आहे.
तुझ्या पालकांनी ज्यू लोकांना प्रेम दाखवलं, त्यांना राहायला हे घर दिलं. हेच खरं इस्त्रायल आहे. दहशतवाद्यांनी द्वेशातून सर्वांना संपवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही लहान मुल वाचलंच. यहुदी लोकांना याआधीही खूप त्रास सहन करावा लागला आहे. पण आजही इस्त्रायलचे नागरिक इथं राहात आहेत, हेच दहशतवाद्यांना दिलेलं खरं उत्तर आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ