हिंदुत्व आम्हाला जोडणारा दुवा - मुख्यमंत्री

विले पार्ले - शिवसेना-भाजपा गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र नांदत आहेत. या दोघांमध्ये मतभेद ही असतात मात्र हिंदुत्व हा दोघांंचाही अजेंडा. त्यामुळेच ही युती टिकल्याचे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं. स्वच्छ प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत विलेपार्लेच्या लोकमान्य सेवा संघाच्या मैदानात पार पडली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. 

सध्या पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजापा युती होणार का याकडे सगळ्य़ांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वस्वी निर्णय घेणार असल्याने फडणवीस पालिका निवडणुकीत ते मित्रपक्षाला सोबत घेतायेत की स्वबळावर लढतायेत हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी मुख्यमंत्री युतीसाठी अनुकुलच आहेत असं म्हणायला हरकत नाही.

Loading Comments