Advertisement

अरबी समुद्रात घुमणार शिवरायांचा जयघोष


SHARES

मुंबई - येत्या 24 डिसेंबरला संपूर्ण मुंबई ही शिवमय होणार आहे. निमित्तही तसंच आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शनिवारी मुंबईत होतोय. यासाठी सरकारंन मेगा प्लॅन आखलाय. दस्तुर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन होतंय. त्यामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रमही भवदिव्य ठेवण्यात आलाय.

कला ज्येष्ठ दिग्दर्शक आणि नेते नितीन देसाई यांनी शिवसृष्टी साकारलीय. जलपूजन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याच्या मार्गात हाजीअली, मरिन ड्राईव्ह अशा ठिकाणी शिवकालीन प्रसंग साकारले जाणार आहेत. सरदार आणि मावळ्यांच्या वेशातले कलाकार त्यांचे स्वागत करतील. नरेंद्र मोदींचं आगमन झाल्यावर स्मारकाच्या जागी जाण्यासाठी एका हॉवरक्रॉफ्टमध्ये मोदी आणि त्यांचा ताफा असणार आहे. या वेळी एकूण तीन हॉवरक्रॉप्ट सज्ज ठेवण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या हॉवरक्रॉफ्टमध्ये मुख्यमंत्री, राज्यपाल, दोन पुजारी, खासदार संभाजीराजे भोसले, खासदार उदयनराजे आणि शिवाजी महाराजांचे वंशजामधील इतर सदस्य, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असणार आहेत. तर तिसऱ्या हॉवरक्रॉफ्टमध्ये उच्चपदस्थ अधिकारी असणार आहेत. भव्यदिव्य आणि सगळ्यांच्या नजरा लागून असलेल्या या कार्यक्रमावर नौदल,एसपीजी,पोलीस, तटरक्षक यांचे लक्ष असणार आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा