चेंबूरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

 Chembur
चेंबूरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

चेंबूर - खारदेवनगर आणि घाटले परिसरात नोटबंदीच्या विरोधात गुरुवारी सायंकाळी चेंबूरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी ब्लॉक क्रमांक 153चे ब्लॉक अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोदी सरकारनं कोणतेही नियोजन न करता नोटबंदीचा निर्णय घेतल्याने सामान्याचे हाल होतायेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. या रॅलीत महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

Loading Comments