Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

तावडेंनी बड्या क्लासेसची सुपारी घेतलीय - आव्हाड


तावडेंनी बड्या क्लासेसची सुपारी घेतलीय - आव्हाड
SHARES

समाजात पुन्हा विषमता आणायची आणि वर्णव्यवस्था प्रस्थापित करायची, यासाठी भाजप सरकार प्रत्येक प्रयत्न आहे. घरातल्या घरात शिकवण्या घेणाऱ्यांना सरकारकडे नोंदणी आवश्‍यक करणे, तसेच आयकर, जीएसटी लागू करण्याच्या प्रस्तावाचा मसुदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तयार केला आहे. विषमता आणि वर्णव्यवस्था आणायचा तो एक बिलंदर प्रयत्न आहे, हे मी विनोदाने नाही तर अतिशय गंभीरपणे सांगतो, असे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनोद तावडेंवर हल्लाबोल केला. महेश ट्युटोरियल किंवा तत्सम बड्या क्‍लासेसची, तावडे यांनी घेतलेली ही सुपारी आहे. तावडे महेश ट्युटोरियलचे विद्यार्थी होते काय? असा सवालही आव्हाड यांनी केला.


ज्ञानदानाच्या कामावर कराची कुऱ्हाड

शालेय मुलांच्या घरबसल्या शिकवण्या घेणाऱ्यांमध्ये बहुसंख्य महिला आहेत. आपल्या शिक्षणाला साजेशी किंवा घराच्या जवळपास नोकरी मिळत नाही, अथवा बाळंतपणानंतर आपल्या मुलावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडलेल्या महिला यात प्रामुख्याने आहेत. त्यात अनेक उच्चशिक्षित आहेत. घरातच काम करून संसाराला चार पैशांचा हातभार लागावा, हा या महिलांचा हेतू असतो. निवृत्तीनंतर आयुष्यात अचानक रितेपणा येतो किंवा पेन्शनमधे भागत नाही म्हणूनही अनेक स्त्रिया हा व्यवसाय करतात.


सावित्रीवाईंच्या वारशांवर केली चिखलफेक

कोण असतात त्यांचे विद्यार्थी ? एखाद्या विषयात कच्ची असलेली, शाळेतल्या सुमार दर्जाच्या शिक्षणामुळे पालकांची चिंता बनलेली, कनिष्ठ किंवा मध्यमवर्गीय घरातली मुलं; ज्यांना महागड्या कोचिंग क्‍लासेसची फी परवडत नाही. चार-दोन मुलांच्या शिकवण्या घेणाऱ्या या महिलांचं उत्पन्न लाखो रुपयांत नसतं. किंबहुना, हे एक ज्ञानदानाचं काम आहे. कराची कुऱ्हाड आता त्यांच्यावरही घालायला सरकार निघालं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या वारशावर आजही केली जात असलेली ही चिखलफेक असल्याची टीका आव्हाड यांनी केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा