'दहशतवादाशी संघर्ष करण्यासाठी जगानं एकत्र येणं गरजेचं'

 Mumbai
'दहशतवादाशी संघर्ष करण्यासाठी जगानं एकत्र येणं गरजेचं'

नरिमन पॉईंट - आंतकवादाशी संघर्ष करण्यासाठी जगाने एकत्र येण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया बलुतिस्तानच्या नेत्या नेला कादरी बलुच यांनी दिलीय. एकात्मिक राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्यावतीनं बलुचिस्तानची प्रादेशिक सुरेक्षेचे महत्त्व या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. या परिसंवादाला उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी, बलुच स्वातंत्र्याचे कार्यकर्ते माजदक बलुच, माजी नौदल अधिकारी कॅप्टन अलोक बन्सल उपस्थित होते.

Loading Comments