दिंडोशीत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये शीतयुद्ध

  Malad West
  दिंडोशीत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये शीतयुद्ध
  मुंबई  -  

  दिंडोशी - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी दिंडोशी भाजप विधानसभेत प्रवेश केलाय. यात प्रामुख्यानं मनसे पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात या पदाधिकाऱ्यांना पदंही बहाल केल्यामुळे आधी भाजपामध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. त्यामुळे उघडपणे नसलं, तरी मराठी-अमराठी कार्यकर्त्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. भाजपाचे दिंडोशीचे नेते मोहित कम्बोज यांच्याकडे कुणीही उघडपणे बोलण्यास तयार होत नाही. मराठी बाणा असलेल्या अनेकांना काही भाजप अमराठी पदाधिकऱ्यांचे विचार खटकत आहेत. मात्र पक्षश्रेष्ठींमुळे सर्वच मूग गिळून गप्प आहेत. महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना नव्यानेच पक्ष प्रवेश केल्यामुळे इन्कमिंग कार्यकर्त्यांना उघडपणे विरोध करता येत नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं.

  याबाबत भाजप नेते मोहित कम्बोज यांना विचारणा केली असता, कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत, याबाबत मला अदयाप कल्पना नाही. कार्यकर्त्यांशी बोलून याबाबत तोडगा काढू असं ते म्हणाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.