मुंबई - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे परिसरात इनकमिंग आणि आऊटगोेईंग सुरू असून राष्ट्रवादीला शिवसेनेने धक्का दिलाय. सोमवारी मातोश्रीत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक देवराम भोईर आणि उषा भोईर यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.