Advertisement

राणेंचे 'हे' कट्टर समर्थक 21लाही राहणार गैरहजर!


राणेंचे 'हे' कट्टर समर्थक 21लाही राहणार गैरहजर!
SHARES

काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. जिथे राणे तिथे कोळंबकर असे कोळंबकरच नेहमी सांगत आले आहेत. मात्र कुडाळमध्ये सोमवारी झालेल्या राणेंच्या शक्ती प्रदर्शनाला कालिदास कोळंबकर गैरहजर राहिले.


21 लाही कोळंबकर जाणार नाहीत

विशेष म्हणजे 21 तारखेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी नारायण राणे ऐतिहासिक राजकीय निर्णय घेणार आहेत. तेव्हाही कालिदास कोळंबकर दांडी मारणार असल्याचे समजते.

दरम्यान याबाबत कालिदास कोळंबकर यांच्याशी संपर्क केला असता, हा कार्यक्रम अचानक ठरला. माझे काही नियोजित कार्यक्रम होते. त्यामुळे मला जाता आले नाही.

नारायण राणे 21 सप्टेंबरला आपला महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहेत. पण यावेळी देखील आपण उपस्थित राहणार नसल्याचे कोळंबकर यांनी स्पष्ट केले. 21 सप्टेंबरला मतदारसंघात घटस्थापनेचा कार्यक्रम असल्याने हजर राहता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा - 

नारायण राणे यांच्या संघर्ष यात्रेचं काय होणार?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा