SHARE

सीएसटी- महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र संजय निरुपम आणि गुरुदास कामत गटांमधला वादही पुन्हा समोर आलाय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बोलावण्यात आलेली बैठकच कामत आणि निरुपम गटातल्या वादामुळे स्थगित करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी काही नेत्यांना दिल्ली दरबारी बोलावलं असल्याची माहिती मुंबई काँग्रेस कार्यालयातल्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मात्र कोणताही वाद झालेला नाही आणि बठाक आयोजितच केली नसल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या