भाजप प्रणित कामगार संघटनेची कार्यकारिणी जाहिर

Dadar
भाजप प्रणित कामगार संघटनेची कार्यकारिणी जाहिर
भाजप प्रणित कामगार संघटनेची कार्यकारिणी जाहिर
See all
मुंबई  -  

दादर - कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजप प्रणित कामगार संघटनेने कामगार क्षेत्रात नवीन पाऊल टाकलय. भाजप प्रणित कामगार संघटनेने शिपिंग, सुरक्षारक्षक, वाहतुक, बेस्ट, माथाडी, पोल्ट्री या मह्त्वपूर्ण क्षेत्रात प्रवेश केलाय. भारतीय जनता माथाडी जनरल कामगार संघ, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ, सिफेरर्स अण्ड शिपिंग युनियन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य वाहतुक संघटना, भाजपा बेस्ट कामगार संघ, भाजपा सुरक्षा रक्षक कामगार संघ, महाराष्ट्र राज्य पोल्ट्री ओनर्स असोसिएशन या सात संघटना घोषित करून कार्यकारिणी जाहिर केली.

माथाडी युनियनच्या अध्यक्षपदी शिवाजीराव पाटील, उपाध्यक्षपदी सुहास माटे, सुजित माटे, चिटणीसपदी संदिप ढवळे, सहचिटणीसपदी गोपाळ श्रीधनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिपिंग युनियनच्या अध्यक्षपद सुहास माटे यांना बहाल करण्यात आले. महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेच्या कार्यकारिणीवर शिवाजीराव पाटील, सरचिटणीस संतोष पाटील, संयुक्त सरचिटणीस विशाल राव, उपाध्यक्ष अनिल दुशमन, ज्ञानेश वायकूळ, मुंबई जिल्हा सरचिटणीस अजित ठिक्का यांची नेमणुक केली गेली आहे. अखिल भारतीय कामगार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सरचिटणीस सुहास माटे यांना पदभार देण्यात आलाय. भाजपा बेस्ट कामगार संघ कार्यकारणीवर शिवाजीराव पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.