कर्नाटकचे मंत्री डी.के.शिवकुमार यांच्यासह मिलिंद देवरा आणि नसीम खान पोलिसांच्या ताब्यात

काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली असून, शिवकुमार यांना भेटण्यास रोखावं असं पत्र आमदारांनी मुंबई पोलिसांना दिलं आहे. त्यामुळं सध्या रेनेसाँ हॉटेलमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

SHARE

कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदारांचे मनवळण्यासाठी काँग्रेस नेते डी. शिवकुमार मुंबईत दाखल झाले. मात्र, कर्नाटकचे मंत्री डी.के.शिवकुमार यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  या आमदारांनी भेटायला नकार दिल्याने शिवकुमार यांची पंचाईत झाली होती. शिवकुमार यांनी या हॉटेलमध्ये खोली बुक केली होती, मात्र हॉटेल प्रशासनाने ऐनवेळी त्यांना बुकींग रद्द केल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणं, शिवकुमार यांच्यासोबत काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुंबईतील पवईतल्या रेनेसाँ हॉटेलमध्ये बंडखोर आमदार थांबले आहेबंडखोर आमदारांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली असून, शिवकुमार यांना भेटण्यास रोखावं असं पत्र आमदारांनी मुंबई पोलिसांना दिलं आहे. त्यामुळं सध्या रेनेसाँ हॉटेलमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सुरक्षा व्यवस्था तैनात 

बंडखोर आमदारांना सुरक्षा मिळावी यासाठी काँग्रेस, जनता दल सेक्युलर आणि २ अपक्ष आमदारांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि डी. के. शिवकुमार हे दोघे आम्ही थांबलेल्या हॉटेलमध्ये येणार असल्यानं आम्हाला त्यांची भीती वाटत आहे. त्यामुळं हॉटेलबाहेर पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात यावी अशी मागणी या लिहिलेल्या पत्रात केली आहे.

१० आमदारांच्या स्वाक्षऱ्या

मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात १० आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. कर्नाटकातील सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस नेते शिवकुमार आणि मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा हे दोन्ही नेते प्रयत्न करण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांनी दिलेला राजीनामा परत घेण्यात यावा अशी विनंती हे नेते करणार आहेत. परंतु, कुठल्याही परिस्थितीत बंडखोर आमदार राजीनामा मागे घेण्यास तयार नाहीत. या दोन्ही नेत्यांना आम्ही न भेटायचं ठरवलं आहे, असे सांगत त्यांनी हॉटेलबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी यासाठी मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे.हेही वाचा -

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलांमधील पाणीसाठ्यात वाढ

लवकरच बेस्टच्या प्रवाशांना मिळणार गारेगार प्रवासाची संधीसंबंधित विषय
ताज्या बातम्या