Advertisement

लवकरच बेस्टच्या प्रवाशांना मिळणार गारेगार प्रवासाची संधी

बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वावर ४०० वातानुकूलित मिनी बसगाड्या दाखल करण्याचा निर्णय मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

लवकरच बेस्टच्या प्रवाशांना मिळणार गारेगार प्रवासाची संधी
SHARES

बेस्टच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. भाडेकपातीनंतर आता लवकरच प्रवाशांना स्वस्तात गारेगार प्रवास करता येणार आहे. बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्वावर ४०० वातानुकूलित मिनी बसगाड्या दाखल करण्याचा निर्णय मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार, १०० गाड्या ऑगस्टमध्ये आणि उर्वरित गाड्या नोव्हेंबर महिन्यात दाखल करण्यात येणार आहेत.

बस गाड्यांमध्ये वाढ

नव्या तिकीट दरांमुळं प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र प्रवासी वाढल्यास त्यांची गैर सोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे वर्षभरातच बसचा ताफा वाढविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं वातानुकूलित प्रवास स्वस्त आता स्वस्त झाल्यानं बेस्टकडून वातानुकूलित बसची संख्याही वाढविली जाणार आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात २५ वातानुकूलित गाड्या असून, भाडेतत्त्वावर आणखी मिडी व मिनी वातानुकूलित बसही दाखल करण्यात येणार आहेत.

प्रस्तावावर शिक्कामोर्तब

मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत ४०० वातानुकूलित मिनी बस दाखल करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. मात्र, याआधी ४५० बसचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तसंच, यासाठी २ कंत्राटदारांची निवड देखील करण्यात आली होती. परंतु, कामगार संघटनांनी भाडेतत्त्वावरील बसगाड्यांना केलेला विरोध आणि त्यामुळं बसगाड्या ताफ्यात करण्याला विलंब झाला. त्यामुळं मिडी बस देण्यास असमर्थता दर्शवण्यात आली. त्यानंतर या प्रस्तावात बदल करत ४५० ऐवजी ४०० वातानुकूलित मिनी बस दाखल करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.



हेही वाचा -

बेकायदा पार्किंग विरोधात वरळीत आंदोलन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा