Advertisement

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ

मुंबईकरांचा पाणी प्रश्नाची चिंता आता मिटण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत पावसाचा जोर मुंबईत ओसरला असला, तरी तलावांमध्ये संततधार सुरू आहे. त्यामुळं मागील २४ तासांत तलावातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ
SHARES

मुंबईकरांचा पाणी प्रश्नाची चिंता आता मिटण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत पावसाचा जोर मुंबईत ओसरला असला, तरी तलावांमध्ये संततधार सुरू आहे. त्यामुळं मागील २४ तासांत तलावातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पाणीसाठा ४ लाख १७ हजार दशलक्ष लीटर इतका झाला आहे. 

५ टक्क्यांनी वाढ

जून अखेरपर्यंत पावसानं तलाव क्षेबात पुरेसा पडत नव्हता. त्यामुळं मुंबईकरांच्य पाणी जूलै अखेरपर्यंतच पाणी पुरवठा इथका पाणीसाठा असल्याचं पालिकेनं घोषित केलं होत. मात्र, त्यानंतर पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शनिवारपासून दररोज तलावांच्या पातळीत ५ टक्क्यांनी वाढ होत आहे. 

४ लाख १७ हजार दशलक्ष लीटर

मंगळवारी तलावांमध्ये आणखी ५७ हजार दशलक्ष लीटरनं पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये एकूण ४ लाख १७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आता जमा झाला आहे. मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यापैकी ३० टक्के पाणी गळती व चोरीमुळे वाया जाते. तलावांमध्ये पाणी कमी असल्याने १५ नोव्हेंबर, २०१८ पासून मुंबईत सरसकट दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली.



हेही वाचा -

हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरूस्त

रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ, आठवडाभरात करणार समिती स्थापन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा