Advertisement

हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरूस्त


हार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाड दुरूस्त
SHARES

कॉटनग्रीन आणि शिवडी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानं हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. या बिघाडामुळं बुधवारी सकाळी ९.१५ वाजल्यापासून लोकल स्थानकात थांबल्या होत्या. त्याचप्रमाणं लोकल वडाळा स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु, रेल्वे प्राशासनानं या बिघाडाची तातडीनं दखल घेत, ही बिघाड दुरुस्त केला. त्यामुळं हार्बर रेल्वेची वाहतूक हळुहळू पुर्वपदावर येत आहे.

प्रवाशांची गर्दी

बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जाव लागलं. लोकल पुढे जात नसल्यामुळं स्थानकांवरही प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती. मात्र, काही वेळानं हा बिघाड दुरुस्त झाल्यानं प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.हेही वाचा -

रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ, आठवडाभरात करणार समिती स्थापनसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा