SHARE

बोरिवली - नेहमी ट्विटमुळे वादात अडकणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळी त्यांनी आपला रोख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे वळवला आहे. 'असहाय्य लोकांवर दादागिरी करून तुम्ही कुठले शौर्य दाखवत आहात?', 'जर दम असेल तर माझ्याकडे या', 'मी दंडुका घेऊन तयार आहे' असे ट्विट करून त्यांनी मनसेला आव्हानच दिले आहे. पाकिस्तानी कलाकारांना काम देणाऱ्या भारतीय दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मनसेने धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर काटजू यांनी मनसेला ट्विट करून हे आव्हान दिले आहे.

काटजू यांच्या या टविट्नंतर अद्याप मनसेची प्रतिक्रिया आलेली नाही. या वक्तव्यावर मनसे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या