Advertisement

... तर गालावर वळ उठतील, राज ठाकरेंचा मुलुंड प्रकरणावरून इशारा

याप्रकरणावरून राज ठाकरे यांनी सरकारलाही सुनावलं आहे.

... तर गालावर वळ उठतील, राज ठाकरेंचा मुलुंड प्रकरणावरून इशारा
SHARES

मुलुंडच्या (Mulund) गुजरातीबहुल सोसायटीत एका मराठी (Marathi) महिलेला ऑफिस खरेदी करण्यापासून रोखल्याने मोठा मुंबईत मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

महिला आणि सोसायटी सदस्यांमधील भांडणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुलुंड पोलिसांनी तक्रार नोंदवली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मनसेने (MNS) याप्रकरणाचा दखल घेत महिलेला विरोध करणाऱ्या पिता पुत्रांना समज दिला होता. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला इशारा दिला आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट करत सरकारला इशारा दिला आहे.

"मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झालं तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे!, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली आहे.

मुलुंड वेस्टमधल्या शिवसदन नावाच्या इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा बघण्यासाठी तृप्ती देवरुखकर गेल्या होत्या. त्यावेळी सोसायटीचे सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांनी महाराष्ट्रीयन व्यक्तींना आम्ही जागा देत नाही असं सांगितले. त्यानंतर तृप्ती यांनी याबाबत दोघांकडे याबाबत जाब विचारला आणि सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सेक्रेटरीने तृप्ती यांच्या हातातून मोबाईल काढून घेतला. तृप्ती देवरुखकर यांनी फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट केला. स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडीओ पोहोचताच त्यांनी पिता पुत्रांना माफी मागायला लावली.हेही वाचा

ठाकरे गटाला धक्का, 3 माजी नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला

टोलवरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा