Advertisement

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार याचं नाव फायनल

शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कुणाला संधी मिळणार याचा सस्पेन्स आता संपला आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार याचं नाव फायनल
SHARES

शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कुणाला संधी मिळणार याचा सस्पेन्स आता संपला आहे. शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांचं नाव फायनल झालं आहे.

संजय राऊत म्हणाले की, "संभाजीराजेंचा आम्ही आदर करतो, म्हणूनच त्यांना पक्ष प्रवेशासाठी निमंत्रण दिलं. या आधी शाहू महाराजांनी शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मालोजीराजेंनी काँग्रेसमधून आणि स्वत: संभाजीराजेंनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे छत्रपतींना कोणत्याही पक्षाचं वावडं नसावं."

संजय राऊत म्हणाले की, "संजय पवार हा शिवसेनेचा मावळा आहे. त्यांनी पक्षासाठी आतापर्यंत खूप काम केलं आहे. त्यामुळेच पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे."

शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केलं.

आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा सेनेतील त्यांचा प्रवास आहे. यासोबतच, सिमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल 30 वर्षे संजय पवार सहभागी आहेत.

दरम्यान, शिवसेनेकडून छत्रपतींसोबत जो अटी शर्थींचा खेळ सुरू आहे हा महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही आहे. तसेच शिवसेनेच्या व्यक्तिरिक्त बाकी पक्ष जी बघ्याची भूमिका घेत आहेत ते ही महाराष्ट्राला आणि आम्हाला आवडलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेने तात्काळ पाठिंबा जाहीर करावा नाहीतर मतांची बेरीज कशी गोळा करायची हे आम्हाला चांगलेच जमते असा इशारा छावा संघटनेने केला आहे.

शिवसेनेने या आधी प्रितिश नंदी, नारायण आठवले, राजकुमार धुत, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, एकनाथ ठाकूर, भरतकुमार राऊत यांना खासदारकी देताना शिवसेनेत प्रवेश करणे सक्तीचे केले होते का? किंवा शिवबंधन बांधले होते का? मग आता संभाजीराजेंनाच ही अट का? असा सवालही विचारण्यात आला आहे.



हेही वाचा

उद्धव ठाकरेंच्या व्यावसायिक पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत, किरीट सोमय्यांचा आरोप

गजानन काळेंकडून शरद पवार-बृजभूषणसिंहांचा फोटो ट्विट, म्हणाले “ब्रिज”चे निर्माते

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा