हेवाळेकर दाम्पत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

 Churchgate
हेवाळेकर दाम्पत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल
हेवाळेकर दाम्पत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल
हेवाळेकर दाम्पत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल
See all

मंत्रालयाच्या दारात गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन ठाण मांडलेल्या हेवाळेकर दाम्पत्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावून भेट घेतली. तसंच वर्षावर प्रतिष्ठापना केलेल्या बाप्पाची हेवाळेकर कुटुंबीयांच्या हस्ते पूजा आणि आरतीही झाली. जातपंचायत प्रकरणात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावं, असे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत.

गणेशोत्सवादरम्यान हेवाळेकर कुटुंब गावी गेलं असताना जातपंचानी त्यांना गावात येण्यास नकार दिला. त्यामुळे या दाम्पत्यानं गणपती बाप्पांची मूर्ती घेऊनच बुधवारी मंत्रालयाच्या दारावर ठाण मांडली होती.

Loading Comments