मनसेचा रोजगार मेळावा

 Goregaon
मनसेचा रोजगार मेळावा
मनसेचा रोजगार मेळावा
See all

गोरेगाव - विरवाणी या ठिकाणी मनसे स्वयंरोजगार विभागाच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त मनसे माथाडी कामगार सेनेचे उपाध्यक्ष घनश्याम परब, मनसे प्रभाग क्र.51 तसंच हिंद फाउंडेशनतर्फे भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिले माझे कर्तव्य फाउंडेशननं यासाठी मार्गदर्शन केलं. रविवारी झालेल्या या मेळाव्यात आठ कंपन्यांचा सहभाग होता आणि 50पेक्षा अधिक इच्छुक तरुणांनी भाग घेतला होता. या वेळी मनसेच्या स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष सुनील बसाखत्रे यांनी मार्गदर्शन करून तरुणांना शुभेच्छा दिल्या.

Loading Comments