जयवंतीबेन मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

 Lower Parel
जयवंतीबेन मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

मुंबई - भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांच्या पार्थिवावर सोमवारी संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली होती. वयाच्या 77 व्या वर्षी मुंबईत सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. जयवंतीबेन मेहता 1962 साली मुंबईत राजकारणात सक्रीय झाल्या. 1968 मध्ये त्या पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यांनी जवळपास 10 वर्षे नगरसेवकपद भुषविले होते. त्यानंतर उर्जा राज्यमंत्री पदही त्यांनी भुषविले होते. दरम्यान जयवंतीबेन मेहता यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.

Loading Comments