Advertisement

'लोकशाही मार्गाने निवडणुकीत सरकारचं दहन करा'


'लोकशाही मार्गाने निवडणुकीत सरकारचं दहन करा'
SHARES

'रिपब्लिकन बांधवांनी आत्मदहन करण्याऐवजी लोकशाही मार्गाने निवडणुकीत सरकारचं दहन करावं' असं आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. रिपब्लिकन सेना या संघटनेच्या कार्यकर्त्याने 'कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणातील आरोपी संभाजी भिडेला अटक करा' या मागणीसाठी मंत्रालयाच्या गेटसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.


काय म्हणाले धनंजय मुंडे?

'रिपब्लिकन बांधवांनी आत्मदहन करण्याऐवजी लोकशाही मार्गाने निवडणुकीत सरकारचं दहन करावं. कोरेगाव भीमाच्या घटनेमागच्या सूत्रधारांवर कारवाई होत नसल्याने बहुजन समाज अस्वस्थ आहे. या दंगलीसंदर्भात शासनाची भूमिका संशयास्पद आहे. समाजातल्या दुर्बल घटकांवर अन्याय होत असल्याची भावना तीव्र' असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.


मंत्रालयासमोर पुन्हा आत्मदहनाचा प्रयत्न

'संभाजी भिडे यांना अटक करा', या मागणीसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीने रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. गणेश पवार असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव असून, तो रिब्लिकन सेनेचा कार्यकर्ता आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.

कोरेगाव भीमा प्रकरणात मिलिंद एकबोटे आणि श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एकबोटे यांना अटक झाली होती. त्यांना जामीनही मिळाला आहे. मात्र, संभाजी भिडे यांना अद्याप अटक झालेली नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा