मुत्सद्दी 'बाबां'ची गोष्ट

    मुंबई  -  

    दादर - मुंबई काँग्रेसध्ये अंतर्गत वाद असल्याचं खुद्द महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेता पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केलंय. त्यांना हे वाद म्हणजे पक्षातील लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेससोबत जमेल तितकं जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याबरोबरची आघाडी का संपुष्टात आली? हे मी अजूनही समजू शकलो नाही असा टोलाही त्यांनी लगावला. आपल्या एकेकाळच्या या मित्रपक्षाच्या भूमिकेवर त्यांनी संयमी शब्दांत शरसंधान केलं. भ्रष्टाचार रोखण्याच्या बाबतीत अयशस्वी ठरलेले मुख्यमंत्री, या आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना त्यांनी आपण रोखलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांचे दाखलेच दिले. माहिती तंत्रज्ञान, केंद्रीय अर्थसंकल्प, नोटबंदी आदी विषयांवर विवेचन करत त्यांनी आपलं 'बाबा' हे टोपणनाव सार्थ ठरवलं. पृथ्वीराज चव्हाण 'मुंबई लाइव्ह'च्या उंगली उठाओ या विशेष कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिले.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.