Advertisement

पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकाल Live updates:


पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकाल Live updates:
SHARES
Advertisement

भाजपाचे खासदार चिंतामण वानगा यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या पालघर लोकसभेच्या जागीसाठी नुकत्याच पोटनिवडणुका पार पडल्या. या पोटनिवडणुका भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीनं चांगल्याच प्रतिष्ठेच्या गेल्या असून इथं खरी लढत ही भाजपा, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीमध्ये झाली आहे. त्यामुळं आता पालघरमध्ये कमळ फुलणार, बाण चालणार की इथं शिट्टी वाजणार याकडंच सर्वांच लक्ष लागलं आहे.


पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकाल Live updates: साठी इथं क्लिक करा


१२ मे रोजी पालघर लोकसभा क्षेत्रात निवडणुका पार पडल्या असून इथं ५३.२२ टक्के इतकं मतदान झालं आहे. ही पोटनिवडणुक सुरूवातीपासून जशी प्रतिष्ठेची ठरली तशीच ती वादग्रस्तही ठरली आहे. कारण उमेदवार फोडाफोडीपासून ते प्रचारसभेत एकमेकांवर चिखलफेक करण्यापर्यंत सर्वच प्रकार इथं घडले. तर मतदानाच्या दिवशी पोटनिवडणुकीचा वादाचा रंग आणखी गडद झाली आहे. मतदानाच्या दिवशी २५० हून अधिक ईव्हीएम मशिन बंद पडल्या नि अनेकांना मतदानापासून वंचित रहावं लागलं. मग ईव्हीएम मशिन घोटाळ्यावरूनही राजकारण रंगल ते अजूनही थांबायचं नाव घेत नाही. त्यातच मतदानाच्या टक्केवारीच्या आकडेवारीवरून भाजपा-सेनेमध्ये वाद सुरू झालं आहे.

अशा वादात पार पडलेल्या आणि सार्या देशाचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला गुरूवारी सकाळी ८ वाजता पालघर इथं सुरूवात झाली आहे. ३३ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार असून इथं कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान भाजपाचे राजेंद्र गावित, बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव आणि शिवसेनेचे श्रीनिवास वानगा यांच्यामध्येच खरी लढत असणार आहे. मतमोजणीला सुरूवात झाली असून दुपारी १२ वाजेपर्यंत मतमोजणीचा कल हाती येण्यास सुरूवात होईल. या मतमोजणीच्या प्रत्येक बातमीवर मुंबई लाइव्हचं लक्ष असून मतमोजणीसंदर्भातील सर्व लाईव्ह अपडेट मुंबई लाइव्ह आपल्यापर्यंत पोहोचवेल.

९.०२ पोस्टल मतमोजणी पालघर-  भाजपा ८१९ , शिवसेना १४५३ आणि बविआ ३२१

९.०१ मतमोजणीला १ तास होऊनही कल जाहीर न केल्याने मतदार-अधिकाऱ्यांमध्ये वादावादी


८.५९ निवडणूक अधिकारी आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक बाचाबाची
एक तास उलटून गेला तरी कल जाहीर नाही
पत्रकारांना बाहेर काढण्याची भाषा

८.५७ पालघरमध्ये पोस्टल मतांमध्ये श्रीनिवास वनगा ३०२ मतांनी आघाडीवर

८.५५ बहुजन विकास आघाडीचे नेते नारायण मानकर दाखल


८.५४ नालासोपाऱ्यातून बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव आघाडीवर

८.५० पहिल्या फेरीत वसई-विरार महापालिकेचे महिले महापौर आणि माकपाचे उमेदवार किरण गहला आश्चर्यकारकरित्या आघाडीवर

८.४७ पालघर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे श्रीनिवास वानगा पुढं

८.४६ विक्रमगडमध्ये अपक्ष उमेदवार २१४३ मतांनी पुढं

८.४६ डहाणूमध्ये राजेंद्र गावित २९५ मतांनी पुढं

८.४५ बोईसरमध्ये शिवसेना १ हजार मतांनी पुढं

८. ४० पोस्टल मतांमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वानगा दुसऱ्या क्रमांकावर

८.३१ पोस्टल मतांमध्ये भाजपाचे राजेंद्र गावित आघाडीवर


८.३० कार्यकर्त्यांची रिघ जमायला सुरुवात

८.२९ पोस्टल मतांच्या मोजणीला सुरूवात, थोड्याच वेळात निघालाचा कल कळायला सुरूवात८.२५ शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचं आगमन 

८.२० पालघरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सोमवारी संध्याकाळी ४६.५० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आलं होतं. मात्र, रात्री उशिरा ही टक्केवारी ५३.२२ पर्यंत पोहोचली आणि विरोधकांनी यासाठी भाजपाला लक्ष्य केलं. एका रात्रीत मतदानाची टक्केवारी कशी वाढली, असा सवाल शिवसेनेने केला आहे. ईव्हीएम मशीन घोटाळ्याबाबत शिवसेनेपाठोपाठ बहुजन विकास आघाडीचे नेते हिंतेंद्र ठाकूर, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी संशय व्यक्त केला आहे.

८.१५ ३३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार होईल अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आलं आहे. मतमोजणी साठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहितीही डॉ नारनवरे यांनी दिली.

८.१२  या मतमोजणी केंद्रात सुमारे ८०० कर्मचारी कार्यरत

८.१० डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई या प्रत्येक विधानसभा क्षेत्रांसाठी प्रत्येकी १४ मतमोजणी टेबल मांडण्यात आले आहेत.

८.०९ पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन  सज्ज असून मतमोजणी सुरू झाल्याची माहिती निवडणूक निर्णय आधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिली.

८.०५ मतमोजणी  सूर्या वसाहतीमधील शासकीय गोडाऊन इथं सुरू

८.०० पालघर लोकसभा निवडणूक मतमोजणीला सुरूवात
 संबंधित विषय
Advertisement