Advertisement

पालघर लोकसभा पोटनिवडणूक निकाल Live updates

SHARE

पालघरचा किल्लेदार कोण? अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी जोर लावला असला, तरी शिवसेना आणि भाजपा यांच्यातच खरी काँटे की टक्कर आहे. म्हणूनच पोटनिवडणूक असूनही या निवडणुकीत ५३.२२ टक्के मतदान झालं. शहरी आणि ग्रामीण भागात जवळपास सारखंच मतदान झाल्याने भाजपाचे राजेंद्र गावित, शिवसेनेचे श्रीनिवास वनगा, बविआचे बळीराम जाधव आणि काँग्रेसचे दामू शिंगडा यांच्यापैकी पालघरचा किल्लेदार कोण होणार? याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

LIVE UPDATES

05:23 PM, May 31 IST
भाजपला आता मित्रांची गरज नाही - उद्धव ठाकरे

आम्ही जे शब्द दिले ते पूर्ण करू - उद्धव ठाकरे

05:21 PM, May 31 IST
हे निवडणूक आयोगाचं काम - उद्धव ठाकरे

एक लाख मतं कशी वाढली? पालघरच्या निवडणुकीत सगळा घोळ झाला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली

आयपीएल प्रमाणे इतर देशातील निरीक्षक बोलवायचे का? - उद्धव ठाकरे  

05:17 PM, May 31 IST
आयुक्तांची नेमणूक नाही नियुक्ती झाली पाहिजे

 

05:16 PM, May 31 IST
उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

उन लागून मशीन बंद पडतात, त्यामुळे आयपीएलसारखं रात्री मतदान घेणार का? रात्रीचं खेळ चाले

05:15 PM, May 31 IST
निवडणूक आयोगाला बागलबुवा संबोधलं

भाजपच्या शिवभक्तीवर आता संशय येतोय - उद्धव ठाकरे


05:14 PM, May 31 IST
उत्तर प्रदेशात योगींची मस्ती उतरवली - उद्धव ठाकरे

 

05:12 PM, May 31 IST
भाजपची लोकप्रियता झपाट्यानं घसरली - उद्धव ठाकरे

  

05:10 PM, May 31 IST
उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

दोन जागा सोडल्या तर सगळीकडे भाजपाचा पराभव



05:08 PM, May 31 IST
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

फुंडकरांना वाहिली श्रद्धांजली

02:12 PM, May 31 IST
कमी कालावधीत लोकांनी दिली साथ- श्रीनिवास वनगा

निवडणुकीला अतिशय कमी कालावधी उरलेला असतानाही लोकांनी साथ दिली. त्यामुळे इतकी मतं मला मिळवता आली. शिवसेनेसोबतच मतदारांनीही माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळेच इतकी मत मिळवू शकलो. या निवडणुकीत झालेल्या चुकांमधून नक्कीच धडा घेऊ आणि २०१९ च्या निवडणुकीत बाजी मारू. 


02:04 PM, May 31 IST
काँग्रेसने अतिशय वाईट वागणूक दिली- गावित

काँग्रेस पक्षाने अतिशय वाईट वागणूक दिली. मी परका आहे, भूमिपूत्रांना तिकीट द्या अशा शब्दांत हिणवलं गेलं. कर्ज काढून काॅंग्रेस पक्ष वाढविण्याचा प्रयत्न मी केला होता. तरीही माझा सापत्न वागणूक मिळाल्याने काॅंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 

02:03 PM, May 31 IST
हा कार्यकर्त्यांचा विजय- राजेंद्र गावित


ज्ञात आणि अज्ञात कार्यकर्तांनी मदत केली, त्या सर्व मतदारांचे आभार. श्रमजीवी संघटना, आरपीआय या सर्वांनी मतदानासाठी खूप मेहनत घेतली, त्यांचा हा विजय आहे.

Advertisement
01:33 PM, May 31 IST
२४ व्या फेरीत गावित यांच्याकडे ४० हजार मतांची आघाडी

01:21 PM, May 31 IST
भाजपाचं सेलिब्रेशन सुरू

राजेंद्र गावित (भाजपा) - २ लाख ६३ हजार ६८०
वानगा (शिवसेना) -२ लाख ३७ हजार ८००
बळीराम जाधव (ब वि आ) २ लाख ८०००
माकप - ७१ हजार ६८६
काँग्रेस- ४६ हजार ८६१

12:59 PM, May 31 IST
गावित यांचा विजय निश्चित

२०व्या फेरी अखेरीस भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्याकडे १९ हजार मतांची आघाडी असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर आतापासूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

12:51 PM, May 31 IST
हा निवडणूक आयोगाचा विजय - संजय राऊत


भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी घेतलेल्या आघाडीमुळे जवळपास त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं आहे. यावर पत्रकारांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया घेतली असता, त्यांनी हा निवडणूक आयोगाचा विजय असल्याचं सांगितलं. पालघरमध्ये आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. आम्हाला मतं देणाऱ्या मतदारांचे आम्ही आभारी आहोत, भाजपाचा विजयही आम्हाला मान्य आहे, परंतु २०१९ च्या निवडणुकीत आम्हीच विजयी होणार असं राऊत म्हणाले. 

12:43 PM, May 31 IST
२० व्या फेरीचे निकाल जाहीर

गावित - २, ६३, ६८३

वानगा - २, ३७, २०७

जाधव - २, ०८, ००९

गेहला -७१, ६८६


12:39 PM, May 31 IST
१९ व्या फेरीत भाजपाला मोठी आघाडी

गावित - २१, ,४०, ०३०

वानगा - १, ८८, ३०७

जाधव - १, ६१, ०८२

गेहला- ६३, ८५६

शिंगडा - ३९, ८४४


Advertisement
12:37 PM, May 31 IST
अठराव्या फेरीत गावित यांना २१ हजार मतांची आघाडी

गावित २, ०१, ९०८ 

वानगा १, ७९, ८६०

जाधव १, ५१, ८९८

गेहला ६१, ५५, ०८

12:31 PM, May 31 IST
भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला


मतमोजणीचा निम्मा पल्ला गाठल्यानंतरही भाजपाने आघाडी कायम ठेवली आहे. त्यामुळे विजयाकडे वाटचाल करत असलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हाती पक्षाचा झेंडा घेऊन हळूहळू रस्त्यावर जमायला सुरूवात केली आहे. 

Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा