Advertisement

'पंतप्रधानांची पत्रकार परिषद म्हणजे ‘मौन की बात’!' - राज ठाकरे

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची उत्तर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनीच दिली. त्यामुळं राज ठाकरे यांनी 'पंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’!' असं म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे.

'पंतप्रधानांची पत्रकार परिषद म्हणजे ‘मौन की बात’!' - राज ठाकरे
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची उत्तर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनीच दिली. त्यामुळं राज ठाकरे यांनी 'पंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’!' असं म्हणत मोदींवर निशाणा साधला आहे.


एकाही प्रश्नाला उत्तर नाही

राज ठाकरे यांनी 'पंतप्रधानांची पत्रकार परिषद... ‘मौन की बात’!', असं ट्विट करत मोदींना टोला लगावला. शुक्रवारी मोदींनी अमित शहांसह पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शहा यांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली. त्यानंतर मोदींनी पत्रकारांना संबोधण्यास सुरुवात केली. मात्र, सरकारचे प्रमुख म्हणून मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देतील, असं उपस्थित पत्रकारांना वाटत होतं. परंतु, पंतप्रधान मोदींना पत्रकरांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.


'मी पक्षाचा शिस्तप्रिय सैनिक'

पत्रकार परिषदेतील सर्वच प्रश्नांची उत्तरं शहांनीच दिली. यावेळी पंतप्रधानांना एक प्रश्न विचारला असता त्यांनी 'मी पक्षाचा शिस्तप्रिय सैनिक आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शहाच देतील,' असं म्हटलं. त्यानंतर पुन्हा एकदा एका पत्रकारानं एका प्रश्नावर मोदींची प्रतिक्रिया विचारली. त्यावर प्रत्येक प्रश्नाला पंतप्रधानांनी उत्तरं देण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत शहांनी त्या प्रश्नाचं उत्तर स्वत:च दिलं.



हेही वाचा -

क्रिकेट वर्ल्डकप जिंकणारी टीम होणार मालामाल, मिळणार ४० लाख डाॅलरचं बक्षीस

विकीच्या भावाची राधिकासोबत जमली जोडी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा