Advertisement

काँग्रेस हरण्यामागची कारणं काय?

२०१९ च्या निवडणुकीत विविध मुद्दे केंद्रस्थानी आणूनही काँग्रेसच्या हाती अपेक्षित यश लागलं नाही. एवढंच कमी की काय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना स्वत:लाही अमेठीत पराभूत व्हावं लागलं.

काँग्रेस हरण्यामागची कारणं काय?
SHARES

१७ व्या लोकसभा निवडणुकीत चमत्काराची अपेक्षा करणाऱ्या काँग्रेससहित इतर विरोधी पक्षांची भाजपाने एकहाती धूळधाण उडवली. २०१४ च्या निवडणुकीपासून काँग्रेसचा परफाॅर्मन्स सातत्याने खालावतच चाललाय. २०१९ च्या निवडणुकीत विविध मुद्दे केंद्रस्थानी आणूनही काँग्रेसच्या हाती अपेक्षित यश लागलं नाही. एवढंच कमी की काय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना स्वत:लाही अमेठीत पराभूत व्हावं लागलं. काँग्रेसचा हा स्वप्नभंग होण्यामागची नेमकी कारणं काय? यावर एक नजर टाकूया.  


राफेलभोवतीच घुटमळली

भ्रष्टाचारमुक्त सरकारचा दावा करणाऱ्या भाजपाला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसच्या हाती २०१४ नंतर सर्वांत पहिल्यांदा जीएसटीचा मुद्दा लागला, जीएसटीने भाजपाला निधीचा पुरवठा करणाऱ्या व्यापारी वर्ग पुरता हैराण झाला होता. त्यापाठोपाठ नोटाबंदी हा मुद्दा आला. नोटाबंदीने तर समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांना सतावून सोडलं. भाजपाचा हा देशातल्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावा देखील विरोधकांनी केला. परंतु काँग्रेसला हे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणण्यात अपयश आलं. तर भाजपाला आपल्या प्रचारातून या दोन मुद्द्यांसहित शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या मुद्द्यांनाही बगल दिली. काँग्रेस केवळ राफेल घोटाळ्याभोवतीच घुटमळत राहिली.


प्रखर राष्ट्रवाद

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादाचा मोठा मुद्दा अचानक भाजपाने उभा केला. पुलवामा हल्ला, त्यानंतर   पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी तळावर भारताने केलेला हवाई हल्ला. यांना निवडणुकीचे मुद्दे बनवत भाजपाने त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला. तुलनेत हवाई दलाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करून काँग्रेसने देशवासियांची नाराजी ओढावून घेतली.


हिंदुत्वाचा मुद्दा

हिंदूत्व हा मुद्दा केवळ भाजपाची मक्तेदारी नाही हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. या दरम्यान असंख्य देवळं, मंदिरांना भेटीगाठी दिल्या. काँग्रेस फक्त मुस्लिमांना जवळ करणारा पक्ष नसून हिंदूत्वाचीही पाठराखण करणारा पक्ष आहे, अशी प्रतिमा निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न पुरता फसला. 


महाआघाडीत अपयश

देशभरातील भाजपाविरोधी पक्षांना जवळ करण्यात काँग्रेसला पूर्णपणे अपयश आलं. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल अशा राज्यांत काँग्रेसला इतर सहकारी पक्षांसोबत आघाडी करणं शेवटपर्यंत जमलं नाही. एवढंच नाही, तर इतर पक्षांना पाठबळ देण्यातही काँग्रेस मागेच राहिली. त्याचाच फटका ऐनवेळी काँग्रेसला बसला. 



हेही वाचा-

जगभरातील नेत्यांनी दिल्या नरेंद्र मोदींना शुभेच्छा

मुंबईसह राज्यात युतीचाच भगवा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा