Advertisement

गोपाळ शेट्टी ग्लॅमरला हरवणार?

ग्लॅमरस उर्मिला मातोंडकर मैदानात असल्याने गोपाळ शेट्टी यांनी जोरदार प्रचार केला. मागील वेळेपेक्षा शेट्टी यांनी यंदा मोठी तयारी केली होती. तर उर्मिलानेही जोरदार प्रचार करत शेट्टींसमोर चांगलंच आव्हान उभं केलं.

गोपाळ शेट्टी ग्लॅमरला हरवणार?
SHARES

उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपाकडून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी पुन्हा एकदा रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून बाॅलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आपलं नशीब अजमावत आहे. ग्लॅमरस उर्मिला मातोंडकर मैदानात असल्याने गोपाळ शेट्टी यांनी जोरदार प्रचार केला. मागील वेळेपेक्षा शेट्टी यांनी यंदा मोठी तयारी केली होती. तर उर्मिलानेही जोरदार प्रचार करत शेट्टींसमोर चांगलंच आव्हान उभं केलं. गल्लोगल्ली जात लोकांशी संपर्क साधत उर्मिलाने मतं मागितली. 

अभिनेत्री असल्याने उर्मिलाला प्रसारमाध्यांनी महत्त्व दिल्याचं दिसून आलं. तर गोपाळ शेट्टी यांनीही मोठ्या रॅली काढत मतदारांशी संवाद साधला. हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. अनेक वेळा प्रचारात उर्मिलासमोर मोदी मोदी अशा घोषणाही देण्यात आल्या. या मतदारसंघात मनसेने उर्मिला मातोंडकरला पाठिंबा दिल्याचं दिसत होतं. मनसे कार्यकर्ते उर्मिलाच्या रॅलीमध्येही दिसून आले. 

उत्तर मुंबईमध्ये यंदा ६६ टक्के मतदान झालं आहे. सर्वाधिक मतदान बोरिवलीमध्ये तर सर्वात कमी मतदान कांदिवली पूर्वमध्ये झालं आहे. बोरिवली भाजपाचा गड मानला जातो. तर कांदिवली पूर्वमध्ये भाजपाचाच आमदार आहे.  

विभागवार मतदान:


  • बोरिवलीमध्ये २,९१,७३८ मतदारांपैकी १,९३,०९८ मतदारांनी (६६.१९ टक्के) मतदान केलं. 
  • दहीसरमध्ये २,५०,६३५ मतदारांपैकी १,५६,३७४  मतदारांनी (६२.३९ टक्के) मतदान केलं.      
  • मागाठाणेमध्ये २,६८,२४९ मतदारांपैकी १,५४,८४२ मतदारांनी (५७.७२ टक्के) मतदान केलं.
  •  कांदिवली पूर्वमध्ये २,६५,१९९ मतदारांपैकी १,४७,७४४ मतदारांनी (५५.७१ टक्के) मतदान केलं.    
  • चारकोपमध्ये २,८२,७६६ मतदारांपैकी १,७१,९११ मतदारांनी  (६०.८० टक्के) मतदान केलं. 
  • मालाड  पश्चिममध्ये   २,८८,६२१ मतदारांपैकी १,६४,२८३ मतदारांनी (५६.९२ टक्के) मतदान केलं. 





Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा