Advertisement

मनोज कोटक भाजपाचा गड राखणार?


मनोज कोटक भाजपाचा गड राखणार?
SHARES

मुंबईत उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघ हा आतापर्यंत सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. यावेळी भाजपाने विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारत नगरसेवक मनोज कोटक यांना या मतदारसंघातून तिकिट दिलं. मनोज कोटक यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांचं आव्हान असणार आहे. संजय दिना पाटील यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला होता. 


उत्तर-पूर्वमधून किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेने तीव्र विरोध केला होता. जर भाजपाने सोमय्यांना तिकिट दिलं तरी शिवसेना त्यांचा प्रचार करणार नाही असा इशाराही शिवसैनिकांनी दिला होता. शिवसेनेच्या या इशाऱ्यानंतर भाजपाने एक पाऊल मागे येत मनोज कोटक यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. उमेदवारी मिळाल्यानंतर कोटक यांनी प्रचाराची राळ उडवून दिली.

संजय दिना पाटील आणि मनोज कोटक यांनी प्रचारात कसलीच कसर सोडली नाही. अगदी गल्लोगल्ली फिरून दोघांनी आपल्यासाठी मतं मागितली. मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकलं हे आता २३ तारखेलाच समजेल.

या मतदारसंघात यंदा एकूण ५७.१५ टक्के मतदान झालं आहे. सर्वाधिक मतदान मुलूंडमध्ये (६३.६६ टक्के ) आणि सर्वात कमी मतदान मानखुर्द शिवाजी नगरमध्ये (४७.०८ टक्के ) झालं आहे. 


मतदानाची विभागवार आकडेवारी

  • मुलूंडमध्ये एकूण २,८३,९३७ मतदारांपैकी १,८०,७४५ (६३.६६ टक्के) मतदारांनी मतदान केलं.
  • विक्रोळीमध्ये २,२६,८३० मतदारांपैकी १,२९,९६७ (५७.३० टक्के) मतदारांनी मतदान केलं.
  • भांडूप पश्चिममध्ये २,७९,६७२ मतदारांपैकी १,६४,९७९ (५८.८८ टक्के) मतदारांनी मतदान केलं.
  • घाटकोपर पश्चिममध्ये २,६५,८६४ मतदारांपैकी १,४८,५८३ (५५.८९ टक्के) मतदारांनी मतदान केलं.
  • घाटकोपर पूर्वमध्ये २,३२,५६३ मतदारांपैकी १,४२,४९३ (६१.२७ टक्के) मतदारांनी मतदान केलं.
  • मानखुर्द शिवाजी नगरमध्ये २,९९,४६५ मतदारांपैकी १,४१,००१ (४७.०८ टक्के) मतदारांनी मतदान केलं.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा