बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी

शिवाजी पार्क - हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर म्हणजेच आज चौथा स्मृतिदिन. या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक आणि नेत्यांचीही गर्दी होती... श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्यांचे हाल होऊ नयेत, म्हणून शिवसेनेनं खाद्यपदार्थांचे स्टॉलही उभारलेत. मुंबईतल्या अनेक प्रभागांमधील महिला कार्यकर्त्यांनी हे स्टॉल उभारलेत. यामध्ये नाश्त्यापासून जेवणापर्यंत सर्वच सोय उपलब्ध आहे. खाद्यपदार्थांचे हे स्टॉल सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 8 पर्यंत सुरू राहणार होते.पुरी-भाजी, पोहे, शिरा, पोळी-भाजी असा जेवणाचा बेत होता. ग्रामीण भागातून येणाऱ्या शिवसैनिकांपासून ते मुंबईतल्या शिवसैनिकांनीही या भोजनाचा आनंद घेतला.

Loading Comments