जावेद जुनेजांचा भायखळ्यात शिरकाव?

  Mazagaon
  जावेद जुनेजांचा भायखळ्यात शिरकाव?
  मुंबई  -  

  भायखळा - बी विभागातील जुन्या 223 प्रभागाचे काँग्रेसचे नगरसेवक जावेद जुनेजा हे सध्या निवडणुकीनिमित्त भायखळ्यातील 213 या नव्या विभागात आपलं नशीब आजमावत आहेत. सध्या हा विभाग ओबीसी पुरुष म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे त्यांनी या विभागाची निवड केली आहे. तिकीट मिळवण्याबाबत ते आग्रही आहेत. पण, खरंच त्यांना तिकीट मिळेल का याबाबत संभ्रम आहे. त्याच बरोबर हा विभाग 60 % मुस्लीम आणि 40% इतर भाषिक आहे. त्यामुळे ते या प्रभागातून उभे राहत आहेत. त्याचबरोबर जुन्या विभागात केलेल्या विकासकामांच्या आधारे मी येथील निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर पक्षातंर्गत सद्य स्थितीतील काँग्रेस आमदार अमीन पटेल यांचा पाठिंबा जावेद जुनेजा यांना आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.