Advertisement

महाविकास आघाडीच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा

येत्या १ डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने (MVA) आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

महाविकास आघाडीच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा
SHARES

येत्या १ डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने (MVA) आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 

विधान परिषदेच्या ५ जागांसाठी १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.

या निवडणुकीसाठी परस्पर सहमतीने उमेदवार उतरवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने ठरवलं आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसकडून या जागांसाठी प्रत्येकी २ उमदेवार देण्यात आले आहेत. तर शिवसेना केवळ एक जागा लढवणार आहे.   

हेही वाचा- ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने होणार जाहीर

याआधी विधान परिषदेची ही निवडणूक एकत्रितपणे लढवायची की नाही हे ठरवण्यासाठी शिवसेना (shiv sena), राष्ट्रवादी आणि काँग्रेस (congress) या तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ही निवडणूक एकत्रितपणे लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या वतीने उमेदवारांच्या नावाची यादी देखील संयुक्तपणे जाहीर करण्यात आली.  

या यादीनुसार शिवसेनेचे श्रीकांत देसाई अमरावती इथून शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील. तर राष्ट्रवादीचे अरूण लाड आणि सतिश चव्हाण अनुक्रमे पुणे आणि औरंगाबाद इथून पदवीधर मतदारसंघात लढत देतील. याचप्रमाणे काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि अभिजीत वंजारी पुणे आणि नागपूर मतदारसंघातून शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढतील.

निवडणूक आयोगाने (ECI) २ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील ५ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली होती. या पाचही जागा १९ जुलैपासून रिकाम्या होत्या. परंतु कोरोना संकटामुळे ही निवडणूक काही काळ लांबणीवर पडली होती. या जागांवर सतिश चव्हाण, चंद्रकांत पाटील, अनिल सोले, श्रीकांत देशपांडे आणि दत्तात्रय सावंत हे सदस्य होते.  

(maha vikas aghadi government declared candidate list for maharashtra legislative council election of graduates and teachers constituency)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा