Advertisement

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘या’ वाहनांना टोलमधून सूट कायम

मंत्रिमंडळ बैठकीत वाहनांचे प्रकार वाढवून ५ इतके करण्याचा निर्णय झाला.

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘या’ वाहनांना टोलमधून सूट कायम
SHARES

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खासगीकरण प्रकल्पांवर केवळ जड वाहनांसाठी पथकर दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याचा तसंच कार, जीप, एसटी व स्कूल बस आणि हलकी वाहने यांची सूट कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही वाढ सुमारे १० टक्के असून प्रस्तावित वाढीव दर हे राष्ट्रीय महामार्गावरील पथकरांच्या तुलनेत कमीच आहेत.

सध्या राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १५ प्रकल्पांतर्गत वाहनांना पथकरातून सूट देण्यात येते. ही सूट दिल्यामुळे या पथकर उद्योजकांना राज्य शासनास (maharashtra government) ३५० ते ४०० कोटी नुकसान भरपाई दरवर्षी द्यावी लागते. ही नुकसान भरपाई रोखीने न देता जड वाहनांवरील पथकर काही प्रमाणात वाढविण्याचा तसंच या पथकर वसुलीसाठी वाहनांचे प्रकार देखील वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

याआधी खालील प्रमाणे वाहनांचे चार प्रकार होते

  • कार, जीप, टाटा सुमो, कमांडर, ट्रॅक्स, वाहनचालक वगळून ६ आसनी प्रवासी रिक्षा व इतर तत्सम
  • मिनी बस किंवा तत्सम वाहने
  • २ आसांचे ट्रक, बस
  • ३ आसांची अवजड वाहने

मंत्रिमंडळ बैठकीत हे वाहनांचे प्रकार वाढवून ५ इतके करण्याचा निर्णय झाला. याप्रमाणे ट्रक-ट्रेलर, तीन पेक्षा अधिक आसांची वाहने हा प्रकार नव्याने समाविष्ट करण्यात येतील.

हेही वाचा - बीएमसी व्यापारी, फेरीवाल्यांची कोरोना चाचणी करणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा