Advertisement

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने होणार जाहीर

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने होणार जाहीर
SHARES

कोरोनाचं संकट हळुहळू निवळत असताना देशपातळीवर खोळंबलेल्या निवडणुका देखील एकापाठोपाठ एक करून मार्गी लावल्या जात आहेत. त्यातच राज्यभरातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेला जुना निवडणूक कार्यक्रम रद्द करून तो नव्याने जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे. (maharashtra gram panchayat election programme rescheduled by election commissioner)

यासंदर्भात अधिक माहिती देताना यू. पी. एस. मदान यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांतील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ फेब्रुवारी २०२० रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ३१ मार्च २०२० रोजी राज्यभरात निवडणूक होणार होती. परंतु अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे १७ मार्च २०२० रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. 

हेही वाचा - ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘या’ वाहनांना टोलमधून सूट कायम

त्याआधी ३१ जानेवारी २०२० पर्यंत अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता १ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी २५ सप्टेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केली आहे. 

त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावं म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या ५ फेब्रुवारी २०२० च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.

हेही वाचा - ऐरोली-कटाई जलद मार्ग सप्टेंबर २०२१ मध्ये खुला

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा